esakal | कोव्हिड लस आणि अमेरिकेचे डावपेच !

बोलून बातमी शोधा

The Vaccine Scaling Problem}
कोव्हिड लस आणि अमेरिकेचे डावपेच !
sakal_logo
By
ज्योती देवरे

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी जाहीर केले की, नोव्हाव्हॅक्‍स यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने तयार केलेली नवीन कोव्हिड-लस कोवोव्हॅक्‍स (covovax) बाजारात आणण्यास सप्टेंबरपर्यंत उशीर होण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेकडून कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्यामुळे काही प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ही लस तयार करणे एक मोठे आव्हान बनले आहे. जर निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर कोव्हिडचे ही परिस्थिती जागतिक युद्ध होण्यास कारणीभूत ठरू शकते. तर खरंच ही एक मोठी समस्या का आहे, हे जाणून घेऊ या...

मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन ही काही बागेत फिरायला जाण्याइतकी सोपी गोष्ट नाही. समजा, जर आपणाला लस तयार करायची असेल तर आपल्याला पेशींची प्रतिकृती ही "सेल कल्चर'मध्ये तयार करावी लागेल. दररोज मोठ्या निर्जंतुकीकरण केलेल्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये त्याचे बीफिंग करावे लागेल. ही पद्धत सोडून दुसऱ्या पद्धतीने देखील त्या "सेल'ला सुरक्षित ठेवून लस तयार करू शकतो. त्यामुळे अनावश्‍यक वेळ वाया जाऊन त्याचा परिणाम लसीच्या उत्पादनावर होऊ शकतो. नोव्हाव्हॅक्‍सकडून (सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने) अशाच पद्धतींचा वापर करून पुढील काही अब्जावधी लसी तयार करण्याचा मानस आहे. लस तयार करण्यासाठी लागणारी बायोरिऍक्‍टर बॅगची सध्या तीव्र कमतरता भासत आहे. सध्याच्या घडीला बायोरिऍक्‍टर बॅगची तीव्र कमतरता असणे म्हणजे कोव्हिड विरुद्धच्या लढाईत खोडा निर्माण करण्यासारखं आहे. एकदा पेशींची संख्या वाढल्यानंतर, आपल्याकडे असलेल्या सूपमध्ये चांगल्या प्रतीच्या व्हॅक्‍सिनचा समावेश असायला हवा. या टप्प्यावर, निर्जंतुकीकरण वातावरणात सर्व सामग्री काळजीपूर्वक फिल्टर करावी लागेल. दुर्दैवाने, याच फिल्टरचा (लसीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्‍यक) देखील पुरवठा कमी आहे.

या प्रक्रियेस मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या साधनांचा पुरेसा पुरवठा आवश्‍यक आहे. बायोरिऍक्‍टर्स आणि फिल्टर पंप यांसारखी महागडी उपकरणे, सिंगल वापरासाठी बायोरिऍक्‍टर बॅग आणि लिपिड या सर्व प्रकारच्या साधनांचा पुरवठा पुरवठादारांकडून आवश्‍यक असतो. मोठ्या प्रमाणात औषध उत्पादनासाठी अनेकदा भागीदार शोधण्याची आवश्‍यकता असते. भागीदार शोधल्यामुळे अनेक कामे जलद गतीने मार्गाला लागतात. त्याचा परिणाम औषध लवकर निर्माण करण्यात होतो. तसेच औषधांचे योग्य डोस कंटेनरमध्ये ठेवण्यासाठी व ते आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोचवण्यासाठी देखील भागीदारांची मदत होऊ शकते. याबरोबरीने डोस देण्यासाठी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना इतर साहित्यांची आवश्‍यकता असते. त्यामध्ये सिरिंज, सुया आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील पीटरसन इन्स्टिट्यूटच्या अहवालातील एका उताऱ्यातील ओळीप्रमाणे, एखाद्या उपकरणाची किंवा उपकरणांच्या तुकड्याची कमतरता संपूर्ण पुरवठा साखळीला थांबवू शकते. तसेच, अमेरिकेने कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हे स्पष्ट झाले की कोव्हिडविरुद्धच्या लढाईत या निर्णयाचा हानिकारक परिणाम होणार आहे.

पण अमेरिकेने असे करण्यामागे कारण काय?

बघायला गेलं तर अमेरिका तांत्रिकदृष्ट्या स्वत:च्या स्वार्थाला प्राधान्य देत आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे, की, त्यांना शक्‍य तितक्‍या कमी कालावधीत 300 मिलियन अमेरिकन नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. म्हणूनच त्यांनी या कच्च्या मालाची देशांतर्गतच साठवणूक केली. खरं तर, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अमेरिकेच्या बायडेन सरकारने नुकताच डिफेन्स प्रॉडक्‍शन ऍक्‍ट लागू केला आहे. या कायद्यानुसार राष्ट्राध्यक्ष "साहित्य, सेवा आणि सुविधा' यांचे वाटप करू शकतात. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा म्हणून एखादा करार बाकीच्या सर्व करारांना बाजूला ठेवून करू शकतात. याचाच अर्थ, कोव्हिड विरुद्धच्या या युद्धात ते निर्यात नियंत्रण लावू शकतात आणि काही गोष्टी परदेशात पाठविण्यापासून रोखू शकतात. बऱ्याच प्रसंगी, मुक्त बाजारात प्रोत्साहनानुसार संसाधनांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु या विशिष्ट प्रकरणात, जेथे सरकारी संसाधने खर्च करावी लागतात तेथे सरकार आदेश देते. यामुळे उत्पादकांना त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. परंतु, त्याचे अनावश्‍यक परिणामही होतात.

उदाहरणार्थ, एनपीआरच्या लेखानुसार - 11 फेब्रुवारी 2021 रोजी फायझर यांनी रुग्णालयांना एक पत्र पाठविले होते, "लस उत्पादनात वाढ झाल्यामुळे इतर औषधांच्या निर्मिती आणि पुरवठ्यामध्ये काही काळ व्यत्यय येऊ शकतो. यामध्ये प्रतिजैविकांना प्रभावित करणारा क्‍लोसीन फॉस्फेट, डेपो-मेड्रोल, स्टिरॉइड तसेच डेपो-टेस्टोस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन सायपिओनेट, जे विशिष्ट हार्मोनल समस्या आणि काही स्तनांच्या कर्करोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात, या गोष्टींचा समावेश आहे.' पत्रात पुढे म्हटले आहे की, "हे तात्पुरते व्यत्यय केवळ लस उत्पादनास प्राधान्य देण्याचे परिणाम आहेत आणि कोणतेही उत्पादन विलंब किंवा समस्यांमुळे होत नाहीत.'

परंतु, आधी सांगितल्याप्रमाणे, याचा सर्वांत मोठा परिणाम हा भारतासारख्या देशांमध्ये दिसून येईल. यामुळे लसीकरण प्रयत्नांना मोठा फटका बसू शकतो. जर SII उत्पादन वाढवू शकत नसेल तर त्याचे परिणाम भारत आणि इतर अनेक देशांना भोगावे लागतील. अशावेळी हे चित्र मात्र नक्कीच आनंददायी नाही, जेव्हा खासकरून आपण कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहोत. म्हणून आशा आहे, की भारतीय आणि ग्लोबल ऍथॉरिटी हस्तक्षेप करू शकतात आणि अमेरिकेला निर्बंध शिथिल करण्यास प्रवृत्त करू शकतात.