Daibetes in india
Esakal
पुणे - 'द लॅन्सेट' मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनच्या (IDF) ताज्या आकडेवारीनुसार भारत डायबेटिसच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे पाश्चिमात्य जीवनशैलीकडे बोटे दाखवत आपण त्याला दोष देत त्याच्यामुळेच हे प्रमाण वाढलेले आहे असे म्हणत असलो तरी अमेरिका या बाबतीत भारताच्या मागे आहे. त्यामुळेच भारतात ही आकडेवारी नेमकी कशामुळे वाढली आहे, कोणत्या वयोगटात हा डायबेटिस सर्वाधिक आहे, डायबेटिसच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, अहवालात २०५० साठी तज्ज्ञांनी कोणता इशारा दिला आहे, कोणत्या देशात डायबेटिसचे किती रूग्ण आहेत, हा महिलांमध्ये अधिक आहे की पुरूषांमध्ये, मधुमेह होतानाची लक्षणे कोणती, तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी आणि तज्ज्ञ याविषयी काय म्हणतात हे सगळं सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.