Premium|Import Duty Impact: अमेरिकी टॅरिफच्या जाळ्यात भारतीय निर्यात, आत्मनिर्भरतेच्या घोषणांना कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे
श्रीराम पवार
shriram1.pawar@gmail.com
अमेरिकेनं भारतातून आयातीसाठी लागू केलेलं ५० टक्के आयात शुल्क किंवा टॅरिफ प्रत्यक्षात आलं आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंधात हा तळ गाठणारा बिंदू आहे. हे अमेरिकेचं एकतर्फी व्यापार युद्ध आहे. अजून तरी भारताकडून त्याचा जशास तसा प्रतिवाद झालेला नाही. अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीत काहीही फरक न होता भारतीय वस्तू अमेरिकी बाजारात मात्र प्रचंड महाग होतील.
साहजिकच त्यातून बरीचशी निर्यात ठप्प होईल. त्याचा परिणाम अर्थकारणासोबत दोन देशांची वाढती जवळीक आणि त्यातून जागतिक भू-राजकीय रचनेतील गृहीत धरल्या जाणाऱ्या समीकरणांवरही होईल. पुन्हा एकदा अमेरिकेवर पूर्णतः विसंबून राहणं अडचणीचं ठरू शकतं याची जाणीव करून देणाऱ्या या घडामोडी आहेत. टॅरिफ युद्ध हे संकट आहे यात शंकेचं कारण नाही. केवळ स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचे नारे देऊन फारतर देशांतर्गत वातावरणनिर्मिती करता येईल. आर्थिक आघाडीवर समोर असलेल्या आव्हानांना तोंड द्यायला तेवढं पुरेसं नाही.