
‘विकसित भारत २०४७’ या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आणि नवीन भारताच्या उभारणीसाठी ऊर्जेला पर्याय नाही. वाढती लोकसंख्या, ग्रामीण भागांतून शहरांकडे होणारे स्थलांतर, झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाचा विस्तार, डिजिटायझेशन आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर या सर्वांमुळे देशातील ऊर्जेची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे शाश्वत विकासासाठी ऊर्जा स्वावलंबन अटळ आणि अपरिहार्य ठरत आहे. ऊर्जेच्या वाढत्या मागणीचा विचार करता स्वदेशी, पर्यावरणपूरक आणि शाश्वत स्रोतांचा स्वीकार करणे हे आधुनिक काळाचे ध्येय आहे. पण, प्रत्यक्षात आपला सध्याचा मुख्य ऊर्जास्रोत पारंपरिक स्वरूपाचा आहे. देशात वीजनिर्मितीसाठी सर्वाधिक प्रमाणात कोळसा वापरला जातो.