
युगांक गोयल, कृती भार्गव
जागतिक लिंग विषमता निर्देशांका’साठीच्या मूल्यांकनांतर्गत सूची ० ते १ या प्रमाणावर मोजली जाते, जिथे १ म्हणजे संपूर्ण समानता. या मूल्यांकनामुळे देशोदेशी तुलना अन् कालानुक्रमिक प्रगती याचे विश्लेषण शक्य होते. जे देश २००६ पासून सातत्याने सहभागी आहेत, त्यांच्याबाबत या निर्देशांकाने ऐतिहासिक व निश्चित कल-प्रवाह दाखवले आहेत.
अद्याप समानता अपूर्ण
२०२५ मध्ये जागतिक लिंग समानतेमधील तफावत ६८.८ टक्क्यांनी भरून काढली गेली आह. मात्र, एकही देश अद्याप संपूर्ण लिंगसमानता साधण्यात यशस्वी झालेला नाही. शिक्षण अन् आरोग्य क्षेत्रात काही प्रगती दिसून आली असली, तरी आर्थिक सहभाग व राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत अजूनही मोठी तफावत आहे. सद्यःस्थितीत, संपूर्ण समानता साध्य होण्यासाठी अजून १२३ वर्षे लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.