मुंबई: खरं तर तुमच्या अकाउंटला धोका आहे, तुम्ही सतत पासवर्ड बदलत रहा, तुमचे अँप्लिकेशन्स अपडेट ठेवा अशा अनेक सूचना सतत तुमच्यावर या ना त्या माध्यमातून येऊन आदळत असतात.
सतत या गोष्टी ऐकून कदाचित तुम्हालाही या गोष्टी कंटाळवाण्या वाटू शकतात. पण आता या सूचना कोणती बँक किंवा कंपनी देत नसून "तुमचा गुगल क्रोम ब्राऊजर लवकरात लवकर अपडेट करा" अशा सूचना भारत सरकारच्या Indian Computer Emergency Response Team (CERT-In) ने दिल्या आहेत.
सायबर हल्लेखोरांकडून अनेक अकाऊंटवर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता भारत सरकारने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन IOS युजर वगळता सर्व क्रोम वापरणाऱ्या सर्वांना केले आहे.
काय आहे हा विषय..? खरोखरच करोडो लोकांचा डेटा धोक्यात आहे का? भारत सरकारने याबाबत नेमक्या काय सूचना केल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या अप्लिकेशनमध्ये कोणते बदल करून या गोष्टीपासून वाचू शकता याविषयी जाणून घेऊया, 'सकाळ प्लस' च्या या बातमीतून..