
कल्याणी शंकर
अवैध स्थलांतरित हा भारत व अमेरिका यांच्या संबंधांतील कळीचा मुद्दा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यात भारतीयांचाही समावेश आहे. याशिवाय, भारताने बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बेकायदा स्थलांतर करण्यास मदत करणाऱ्यांविरोधातही कठोर पावले उचलली पाहिजे. अवैध स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासन आणि देशातील सुज्ञ नागरिक यांनी मिळून जनजागृती करणे आवश्यसक आहे.