Social Media Policy Change
Esakal
पुणे – महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर दादांचे अनेक एआय जनरेटेड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यात हुबेहुब त्यांचाच आवाज आणि त्यांचीच प्रतिकृती असणारी व्यक्ती काही बोलताना दिसत होती. फक्त दादाच नाही तर गेल्या काही काळात अशा प्रसिद्ध व्यक्तींचे अनेक एआय जनरेटेड व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. सुरूवातीला हे व्हिडिओ करण्यामागे मनोरंजन हा हेतू होता मात्र हल्ली या सगळ्यानेच वेगळे रूप धारण केले आहे. खोटी आणि चुकीची माहिती देणारा कॉन्टेंट आता तीन तासाच्या आत मिडिया प्लॅटफॉर्मवरून हटवावा लागणार आहे.
पण भारताने हा निर्णय घेण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत, हा एकूणातच विषय काय आहे, आयटी विभागाने कोणत्या नियमात बदल केले, ३ तासात व्हिडिओ काढण्याचा नियम काय, एआय जनरेटेड कॉन्टेंटला कोणता नियम लागू झालाय, हे नियम पाळले नाहीत तर काय होईल, या नियमाच्या चांगल्या वाईट बाजू कोणत्या आणि क्रिएटरचं याविषयी म्हणणं काय हे सगळं या लेखाच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.