पुणे: पोटाच्या घेराविषयी अनेक जोक्स केले जातात. कधी कधी बॉडी मास इंडेक्सच्या आकड्यांखाली हा घेर लपून जात होता पण आता नाही. आता भारतीय व्यक्तींच्या लठ्ठपणाविषयी काही नवे आणि नेमके निकष आले आहेत. कारण The Lancet Diabetes and Endocrinology ने १५ जानेवारी रोजी लठ्ठपणाची नवी व्याख्या जाहीर केली आहे.
गेल्या अनेक दशकांपासून 'बॉडी मास इंडेक्स' (BMI) हे लठ्ठपणा मोजण्याचे एक साधन म्हणून वापरलं जातं आहे. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वजनाला त्यांच्या उंचीने भागून चरबीचे मोजमाप केले जाते आणि ज्यांचा बीएमआय हा ३० पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना लठ्ठ मानले जाते.
मात्र आता भारतीय लठ्ठपणाच्या व्याख्येत बदल झाला असून तुमच्या ओटीपोटाची चरबी किंवा तुमच्या पोटाचा घेरहासुद्धा लठ्ठपणाविषयीच्या व्याख्येतील मुख्य भाग झाला आहे.
भारतीय डॉक्टर भारतीयांच्या लठ्ठपणाविषयी काय म्हणतात? नवी मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जगातील लोकांपेक्षा भारतीयांचा लठ्ठपणा कसा वेगळा आणि याला त्रिस्तरीय आजार (three-tier disease) का म्हंटले जात आहे जाणून घेऊया..