Premium|Study Room : रब्बी हंगामासाठी खत अनुदानात ६४ टक्क्यांची वाढ; शेतकऱ्यांना किती आर्थिक दिलासा मिळणार?

Rabi Season Fertilizer Subsidy : रब्बी हंगाम २०२६-२७ साठी केंद्र सरकारने खत अनुदानात ६४ टक्क्यांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किती दिलासा मिळणार?
Rabi Season Fertilizer Subsidy

Rabi Season Fertilizer Subsidy

esakal

Updated on: 

खतांच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावर होतो. पण यंदा रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने खत अनुदानात तब्बल ६४ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यासाठी ६२ हजार ३७० कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील खतांच्या वाढत्या किमती, कच्च्या मालाचा तुटवडा आणि आयातीवरील अवलंबित्व लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, सरकारने केवळ अनुदान वाढवण्यावर भर दिलेला नाही, तर देशांतर्गत खत उत्पादन, पर्यायी खतांचा वापर आणि खतांचा पुरेसा साठा याकडेही लक्ष दिलं आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर किती अतिरिक्त भार पडणार? खतांच्या अनुदानाचे नवे दर काय आहेत? देशात खरंच पुरेसा खतसाठा उपलब्ध आहे का? आणि शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दरवाढीपासून नेमका किती दिलासा मिळणार? या सगळ्या गोष्टी समजून घेऊया.

रब्बी हंगामासाठी सरकारची मोठी घोषणा, खत अनुदानात ६४ टक्क्यांची वाढ!
केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम २०२६-२७ साठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खत अनुदानाच्या रकमेत तब्बल ६४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी ६२ हजार ३७० कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम ३७ हजार ९५२ कोटी रुपये होती. म्हणजेच यंदा अनुदानासाठी तब्बल २४ हजार ४१८ कोटी रुपये अधिक खर्च केले जाणार आहेत.
आता प्रश्न असा की, सरकारने एवढी मोठी वाढ का केली? तर आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती सतत बदलत आहेत. या वाढत्या किमतींचा भार थेट शेतकऱ्यांवर पडू नये, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. हे अनुदान १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या काळात लागू असेल.

इराण संघर्षाचा खत बाजाराला फटका, सल्फरचे दर सहा महिन्यांत दुप्पट
फेब्रुवारीमध्ये इराणवर हल्ले झाले आणि त्यानंतर जागतिक खत व ऊर्जा व्यापारासाठी महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली. याचा परिणाम खतांच्या पुरवठ्यावर झाला. विशेषतः फॉस्फेट खतांसाठी आवश्यक असलेल्या सल्फरचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांत सल्फरचे आंतरराष्ट्रीय दर दुप्पट झाले. फॉस्फेट खतांच्या किमतीही २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या.
आपल्या देशाला लागणाऱ्या डीएपी खतापैकी सुमारे ६० टक्के खत आयात करावं लागतं, तर पोटॅशसाठी भारत पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारातील दरवाढीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसू नये, म्हणून सरकारने खत अनुदानात वाढ केली आहे.

Loading content, please wait...