
युगांक गोयल, प्राध्यापक, ‘फ्लेम’ विद्यापीठ संचालक, ‘सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्ह’ / कृती भार्गव, विद्यार्थिनी
आपल्या देशात लठ्ठपणाची समस्या नकळत पण अतिशय वेगात फैलावत आहे. एके काळी श्रीमंत राष्ट्रांची समस्या मानली जाणारी लठ्ठपणाची समस्या शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो भारतीयांना भेडसावू लागली आहे. विख्यात विज्ञान संशोधन पत्रिका ‘लॅन्सेट’ने १९९० ते २०२१ दरम्यान सर्वाधिक लठ्ठ व्यक्ती असलेल्या देशात अमेरिका, चीननंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या समस्येचा आकडेवारीसह केलेला उहापोह...
आपल्या देशासमोर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अनेक आव्हाने आहेत. त्यांच्याशी झुंजत असताना एक समस्या अतिशय शांतपणे पण तीव्रतेने फैलावत आहे. ही समस्या म्हणजे लठ्ठपणाची समस्या. एके काळी श्रीमंत राष्ट्रांची समस्या मानली जाणारी लठ्ठपणा आता शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो भारतीयांना भेडसावू लागली आहे. जगविख्यात विज्ञान संशोधन पत्रिका ‘लॅन्सेट’ने १९९० ते २०२१ दरम्यान प्रौढ नागरिकांचे वाढते वजन आणि स्थूलपणाच्या जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रमाणाचा केलेला अभ्यास आणि २०५० पर्यंत जागतिक स्तरावर लठ्ठपणाचे किती प्रमाण राहील याचा २०२१ मध्ये अभ्यास केला होता.