Premium|India stock market investment picks : भारतीय शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीची मोठी संधी; 'मोतीलाल ओसवाल'कडून १० दमदार शेअर्सची शिफारस!

Financial and FMCG Sector Market Performance Analysis : भारतीय शेअर बाजारातील मजबूत आर्थिक स्थिती आणि विस्तार योजनांच्या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल समूहाचे सिद्धार्थ खेमका यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुचवलेल्या विविध क्षेत्रांतील १० आघाडीच्या कंपन्यांचा सविस्तर अभ्यासपूर्ण आढावा.
India stock market investment picks

India stock market investment picks

esakal

Updated on

सिद्धार्थ खेमका

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

भारतीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांनी अलीकडील तिमाहीत दमदार कामगिरी नोंदवली असून, मजबूत आर्थिक स्थिती, विस्तार योजना आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. एफएमसीजी, वित्तीय सेवा, नवीकरणीय ऊर्जा, पोलाद, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील निवडक १० कंपन्यांची शिफारस येथे करण्यात आली आहे.

(उद्दिष्टपूर्ती कालावधी : एक वर्ष)

झायडस वेलनेस (उद्दिष्ट : रु. ५७५)

झायडस वेलनेसचे रूपांतर बहुवर्गीय एफएमसीजी कंपनीत होत असून, त्याला विस्तारणाऱ्या उत्पादनसंग्रहाची आणि कॉम्प्लॅन ब्रँडच्या संपादनाची जोड मिळाली आहे. ग्रामीण भागातील सुधारलेली मागणी, भक्कम ब्रँड इक्विटी आणि राइटबाइटसारख्या नव्या श्रेणींचा विस्तार यामुळे कंपनी दीर्घकालीन वाढीस चालना देणारे घटक मजबूत करत आहे. अर्थवर्ष २०२६ ते २०२८ अखेर महसूल आणि ‘ईबीआयटीडीए’ यांचा चक्रवाढ वार्षिक वृद्धीदर अनुक्रमे २६ टक्के आणि ३५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

एंजल वन (उद्दिष्ट : रु. ४००)

ही कंपनी मध्यवर्ती डिस्काउंट ब्रोकिंग व्यवसायापलीकडे संपत्ती व्यवस्थापन, कर्जपुरवठा आणि एमटीएफ व्यवसायांतही आपले स्थान भक्कम करत आहे. विविध योजनांचा अवलंब, कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित व्यासपीठातील सुधारणा आणि आवर्ती बिगर-ब्रोकिंग महसुलाचे वाढते योगदान यामुळे उत्पन्नात सुधारणा होऊन ट्रेडिंग चक्रावरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा आहे. अर्थवर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या व्यवसायात लक्षणीय सुधारणा झाली असून, संपत्ती व्यवस्थापनाखालील मालमत्ता १०० अब्ज रुपयांपलीकडे पोहोचली आहे, तर एकूण कर्जवितरण २७.१ अब्ज रुपयांवर गेले आहे. अर्थवर्ष २०२६ ते २०२८ अखेर महसूल आणि निव्वळ नफा यांचा चक्रवाढ वार्षिक वृद्धिदर अनुक्रमे २१ टक्के आणि ३३ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com