
अजेय लेले
भारत व पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या संघर्षात आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही बाबतींत भारताने जी उच्च तंत्रज्ञानाधिष्ठित शस्त्रप्रणाली यशस्वीरीत्या वापरली, तिचे महत्त्व खूप मोठे आहे. तंत्रज्ञानाच्या अचूक आणि परिणामकारक वापराचा तो एक वस्तुपाठच म्हणावा लागेल.
भा रताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने बदलेल्या युद्धतंत्राचे वैशिष्ट्य ठळकपणे नजरेस आणले आहे. दहशतवादविरोधी मोहिमेत आणि व्यूहनीतीत भारताने केलेला हा महत्त्वाचा अंतर्भाव आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरच नव्हे तर थेट पाकिस्तानच्या भूमीत घुसून निश्चित केलेल्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्रांचा मारा ज्या अचूकरीतीने करण्यात आला, त्यामागे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर भारतीय लष्कराने यशस्वी रीतीने केला.