Premium|Indian Athletics : भारतीय ॲथलेटिक्समध्ये पदक क्रांती; राष्ट्रकुल स्पर्धेने बदलली खेळाडूंची मानसिकता

Commonwealth Games : राष्ट्रकुल स्पर्धेतील अनुभवातून भारतीय ॲथलीट्समध्ये निर्माण झालेली विजिगीषू वृत्ती आता आशियाई आणि जागतिक स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याच्या मानसिकतेला नवी ताकद देत आहे.
Commonwealth Games

Commonwealth Games

esakal

Updated on

नरेश शेळके - sakal.avtaran@gmail.com

राष्ट्रकुल स्पर्धेतील यशामुळे भारतीय ॲथलेटिक्समध्ये सुरू झालेली पदक क्रांती मानसिकतेच्या परिवर्तनाची कहाणीच म्हणावी लागेल. विजिगीषू वृत्तीच्या बळावर भारतीय ॲथलीट्स आता आशियाई अन् जागतिक आव्हानांसाठी सज्ज झाले आहेत.

बार्सिलोनामध्ये १९९२ मध्ये झालेल्या ऑलिंपिकपूर्वी बहादूर प्रसादने इंग्लंडमध्ये पाच हजार मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, ऑलिंपिकमध्ये त्याला पहिल्या फेरीचा अडथळाही पार करता आला नाही. विशेष म्हणजे, पुढच्याच वर्षी मनिलामध्ये झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. १९९८ च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्योतिर्मयी सिकदरला पदक जिंकता आले नव्हते. मात्र, अवघ्या तीन महिन्यांनी बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली... अशी अनेक उदाहरणे देता येतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com