

Indigo Airlines Crisis
esakal
इंडिगो नागरी विमान वाहतूक कंपनीचा गोंधळ आता शमत आहे. या क्षेत्रात सुमारे ६६ टक्के बाजार हिस्सा, म्हणजे मक्तेदारी असणाऱ्या, चारशेहून अधिक विमाने बाळगणाऱ्या या कंपनीने काही दिवसात जवळजवळ तीन हजार उड्डाणे रद्द केली. याच काळात अनुभवास आलेली एक गोष्ट म्हणजे इतर स्पर्धक विमान कंपनीने आपल्या प्रवासाच्या भाड्यात अचानक कितीतरी पटीने वाढ केली आणि आधीच त्रासलेल्या प्रवाशांची पिळवणूकच होऊ लागली. देशातील विमान वाहतूक व्यवस्थापनाचा यानिमित्ताने आढावा घेणे गरजेचे आहे.