kiran seth
Esakal
“माझे ते आयआयटी खरकपूरमधले दिवस होते. विद्यार्थीदशेत असताना खरं तर मी पाश्चात्य संगीताच्या खूप प्रेमात होतो. आयआयटीच्या माझ्या मित्रांमध्येही त्याचेच वेड होते. पण आमच्या एका शिक्षकांनी आम्हाला त्यांच्या रात्रभराच्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला बोलावले. आम्ही मागे टंगळमंगळ करत बसलो होतो. पण तरीही त्या दिवशी मनात आत कुठेतरी काहीतरी गूढ काहीतरी खोलवर हललं असं वाटलं. तिथून पुढे मी खूप आवर्जून जेव्हा शास्त्रीय संगीत ऐकायला लागलो तेव्हा माझा मीच हरवलेला मला पुन्हा सापडतोय असं वाटायला लागलं. मला वाटतं ही सांगण्याची किंवा वर्णन करण्यासारखी गोष्ट नाहीच.. हा अनुभवण्याचा विषय आहे. मी त्या रात्री जे अनुभवले आणि त्यातून मला जे मिळालं ते भारतातल्या वीस लाख संस्थांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावं असं मला वाटतं आणि म्हणून हा ‘स्पिक मॅके’ नावाचा ४९ वर्षांचा प्रपंच आहे असं मला वाटतं.”