

Indian Economy
sakal
देश ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना भारताला अर्थव्यवस्थेपुढे निर्माण होणारी संभाव्य अंतर्गत आणि बाह्य प्रतिकूलता, संभाव्य भू-राजकीय संकटे, पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या संभाव्य सीमापार कुरापती आणि त्यांना अमेरिका-चीनसारख्या महासत्तांच्या मिळणाऱ्या छुप्या पाठबळामुळे उद्भवणाऱ्या स्थितीचा मुकाबला करावा लागेल. भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याची आव्हाने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांसमोर आहेत, याचे भान ठेवावे लागेल. राज्यघटनेने स्वीकारलेल्या मूल्यचौकटीला तडा न जाता प्रगतीची झेप घेणे यात सगळ्यांचीच कसोटी लागणार आहे.