India's Global Stanceesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| G7 Summit: सात शिष्टमंडळे आणि सात देश
Countering Terrorism: भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा जागतिक स्तरावर नेला आहे. आता पंतप्रधान मोदींना जी-७ राष्ट्रांसमोर हे विषय मांडण्याची संधी मिळणार आहे.
सुनील चावके
मुत्सद्देगिरीच्या मोहिमेवर पाठवलेली सात सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे मायदेशी परतल्यानंतर आता पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा जगातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत आणि उदार लोकशाही असलेल्या सात राष्ट्रांच्या प्रमुखांसमोर मांडण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे.
कोणतेही दहशतवादी कृत्य हे भारताविरुद्ध छेडलेले युद्ध समजले जाईल, पाकिस्तानच्या आण्विक धमक्यांना भारत भीक घालणार नाही; तसेच दहशतवादी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांमध्ये भारत यापुढे भेद करणार नाही, या भारताच्या नवसंकल्पाचा पुनरुच्चार अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इटलीच्या राष्ट्रप्रमुखांपुढे पंतप्रधान मोदी यांना करावा लागेल.