
डॉ. अनिल पडोशी
सोन्याची मागणी आणि भाव जगात प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. इतर देशांमध्ये अनिश्चितता असतानाही तेथे सरकारी खरेदी जास्त आणि कौटुंबिक खरेदी कमी असते. भारतातील चित्र मात्र उलटे आहे. यात आवश्यकता असते, ती समतोलाची.
आपल्या देशापुढील दारिद्र्य, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न अद्यापि सुटलेले नाहीत. अनेक अर्थतज्ज्ञ याविषयी बोलत-लिहित आहेत. कोणत्याही वस्तूंची किंवा रेल्वे- बस वाहतूक इत्यादी सेवांची किंमत वाढली की, ‘महागाईचा हाहाकार’,‘गृहिणींचे बजेट कोलमडले’, अशा बातम्या वाचायला मिळतात. परंतु, गुढीपाडव्याला हाच सर्वसामान्य मनुष्य मोठ्या दणक्यात सोन्याची खरेदी करतो.