
कमोडोर श्रीकांत देशमुख
कारगिल युद्धात भारतीय नौदलाची प्राथमिक भूमिका ‘ऑपरेशन तलवार’ अमलात आणण्याची होती, ज्यात पाकिस्तानी बंदरे, विशेषत: कराची, अडवून त्यांच्या पुरवठा वाहिन्या विस्कळित करणे आणि पाकिस्तानवर आर्थिक दबाव आणणे समाविष्ट होते. या कारवाईचे हे स्मरण...उद्या (ता. २६) कारगिल युद्धाला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त.
भा रताच्या मुत्सद्देगिरीसाठी १९९९ हे वर्ष खडतर होते. त्यावेळी भारत सरकार पाकिस्तानबरोबर काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी ‘चिनाब फॉर्म्युल्या’वर आधारित प्रयत्न करत होते, मात्र पाकिस्तानने भारताच्या शालीनतेला कारगिल घुसखोरीद्वारे दुष्टपणाने प्रत्युत्तर दिले होते.