

Future fast train of India
esakal
भारतामध्ये रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित आणि स्वस्त प्रवास समजला जातो. रेल्वेचा प्रवास आज जरी सर्वात स्वस्थ असला तरी सुध्दा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी येऊ शकेल इतकी सध्या तरी भारतीय रेल्वे सक्षम नाही. रेल्वेच्या बाबतीत विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ ही आजही मोठी अडचण आहे. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे कशी तोकडी ठरते हे आपण सर्वांनी इंडिगोची विमानसेवा कोलमडली तेव्हा पाहिलच. एकेकडे परदेशात ६०० च्या स्पीडने धावणाऱ्या गाड्यांच्या यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे आपल्या देशात आजही वंदे भारत वगळता एकही ट्रेन १५० पेक्षा जास्त वेगाने नियमित धावू शकत नाही.
आता मात्र भारतीय रेल्वे या अवस्थेत जास्त काळ राहणार नाही. कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतीय रेल्वेमध्ये ऐतिहासिक बदल होणार आहेत. भारतीय रेल्वे येणाऱ्या काळात देशात अनेक वेगवान गाड्या आणण्याचा विचार करत आहे. अशा वेगवान रेल्वेच्या चाचणीसाठी वेगळे रेल्वेरूळ बनवण्याचे सुध्दा काम चालू आहे. राजस्थानमध्ये सध्या ९६७ कोटी रूपये खर्च करून चाचणीसाठी नवा रेल्वेरूळ उभारला जात आहे. हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
चाचणीसाठी नवा रेल्वेरूळ बांधायची गरज का पडली? या रेल्वेरूळासाठी राजस्थानचीच निवड का झाली आणि यामुळे देशातील रेल्वेगाड्यांचा वेग कितपत वाढू शकेल? या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेऊया सकाळ+च्या या लेखातून.