Premium|Indian Religions : भारतातून आग्नेय-आशियात हिंदू आणि बौद्ध धर्म कसे पोहोचले?

Indian Religions in Southeast Asia : भारतातून आग्नेय-आशियात हिंदू, बौद्ध आणि इस्लामी धारणांचा झालेला प्रसार, सम्राट अशोकाचे धर्मप्रचारक, गुणवर्मन यांचे योगदान आणि जैन धर्माच्या अनुपस्थितीमागील ऐतिहासिक प्रश्नांचा आढावा.
Indian Religions in Southeast Asia

Indian Religions in Southeast Asia

esakal

Updated on: 

डॉ. पुलि ंद सामंत - sakal.avtaran@gmail.com

गेल्या लेखात आपण भारत आणि आग्नेय-आशियादरम्यान झालेल्या अ-भौतिक - भाषा, लिपी, साहित्य, स्थापत्य, शिल्प इत्यादी देवाणघेवाणीचा आढावा घेतला. त्यासंदर्भात एका महत्त्वाच्या गोष्टीचा परामर्श वेगळेपणाने आजच्या या स्वतंत्र प्रकरणाद्वारे घेण्याची गरज आहे. ती गोष्ट म्हणजे धर्म. ज्याने मानवी व्यक्ती तथा समाजमनाची धारणा होते तो धर्म, या सुटसुटीत व्याख्येच्या चौकटीत बसणाऱ्या धारणांचे वहन भारताकडून आग्नेय-आशियात वेगवेगळ्या कालखंडांमध्ये झाले, जे हिंदू आणि (महायान-पंथी) बौद्ध होते. तत्पूर्वी, स्थानिक लोकसमूह केवळ निसर्गपूजक होता. कालांतराने इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकात इस्लामने भारतात आपले स्थान बळकट केल्यानंतर इस्लामी धारणेचे वहन भारतातून तेराव्या शतकात तिथल्या एका विशिष्ट भागात झाले. मात्र, जैन धर्म प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात असताना आणि जैन व्यापाऱ्यांचे चलनवलन आग्नेय-आशियात होत असण्याचे संदर्भ प्राचीन जैन साहित्यात सापडत असताना त्या धर्माच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र तिथे सापडत नसल्याचे आश्चर्य वाटते.

सम्राट अशोकाने बौद्धमताच्या प्रसारासाठी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ‘सुवर्णभूमी’त प्रचारक पाठवले होते, हे आपल्याला ज्ञात आहेच. मात्र, तेव्हा प्रचलनात असलेली ‘सुवर्णभूमी’ भूमिज आग्नेय-आशियापुरती मर्यादित असावी. तिथून पुढे बिकट भौगोलिक परिस्थितीमुळे किंवा दळणवळणाच्या साधनांच्या अभावाने किंवा परस्पर धार्मिक स्पर्धेमुळे बौद्धमताचा प्रसार द्वीपकल्पीय आग्नेय-आशियात व्हायला काही शतके जावी लागली. त्याचे उदाहरण म्हणजे इंडोनेशियात बौद्धमताचा शिरकाव होण्यास इसवी सनाचे पाचवे शतक उजाडावे लागले. दुसरे म्हणजे तेही तोपर्यंत भूमिज उपखंडात स्थिर झालेल्या भारतीय बौद्ध दूतांच्या माध्यमातून नव्हे; तर भारतातून तिथे थेट पोहोचलेल्या काश्मिरी राजपुत्र गुणवर्मन याच्या माध्यमातून झाले.

Loading content, please wait...