
भूषण महाजन
शेअर बाजाराचे खरेदी धोरण आखताना सरकारी बँकांचा व त्याबाहेरील फायनान्स कंपन्यांचा विचार करावा लागेल. आपल्या आवडीच्या कुठल्याही बँकेत गुंतवणूक करता येईल व जुलैमध्ये तिमाही निकाल जाहीर झाल्यावर ते समाधानकारक असल्यास गुंतवणूक वाढवता येईल.
वाचकहो, गेले दोन महिने आम्ही शेअर बाजारात तेजीच आहे, मंदी करू नका, अगदीच वाटले तर नफा वसूल करा पण प्रत्येक घसरणीचा फायदा घेऊन तेजी करा, असे सुचवीत होतो. १८ एप्रिलला तर पुण्यात एका जाहीर सभेत आम्ही आत्मविश्वासाने सांगितले, की आता निफ्टीचा मागे झालेला २१८००चा तळ विसरा, पुढे तेजीच आहे.