
भूषण महाजन
kreatwealth@gmail.com
शेअर बाजारातील चढ-उतार सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बुचकळ्यात पाडतात. खरेदी कधी आणि कोणत्या शेअरची करावी, विक्री कधी करावी हे नेमके उमजत नसते. अशावेळी शांतपणे शेअर बाजारातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या जोखीम-क्षमतेनुसार निर्णय घेणे गरजेचे असते. आता केवळ स्वप्नरंजनावर व कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या भाष्यावर शेअर वर जाणार नाहीत, त्यासाठी भक्कम आधार लागेल. सेंटिमेंट बदलले व शेअर बाजार खाली आला, तर आपल्याला नाराज व्हायचे कारण नाही, म्हणूनच आम्ही म्हणतो, ‘तुझसे नाराज नहीं, हैरान हूं मैं! (हे मराठीतील ‘हैराण’ आहे!)