
US Visa Crisis
esakal
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर ‘व्हिसा संकट’ उभे ठाकले आहे. सध्या अंदाजे ११ लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिकत आहेत; परंतु भारतीय विद्यार्थ्यांना या संकटाचा सर्वांत जास्त फटका बसला आहे. व्हिसा धोरणातील सातत्याने बदलणारे निर्णय आणि वाढत चाललेली अनिश्चितता यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याच्या भविष्याबद्दल कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले जात आहे. विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शिक्षण वाया जाण्याचा धोका असल्याने व्हिसा समस्येचे निराकरण करणे अत्यावश्यक आहे.
जगाच्या विविध देशांमधून अमेरिकेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हिसा संकटाला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे व्हिसा संकट गंभीर झाले आहे. भारतातील विद्यार्थ्यांवर त्याचा लक्षणीय परिणाम झाला असून, अनेक जण त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणाबद्दल चिंतेत आहेत. सध्या अंदाजे ११ लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिकत आहेत; परंतु भारतीय विद्यार्थ्यांना या संकटाचा सर्वांत जास्त फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर, विशेषतः भारतातील विद्यार्थ्यांवर अलीकडे झालेल्या कारवाईची तीव्रता वाढली आहे आणि त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत. या अनिश्चिततेमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याच्या भविष्याबद्दल कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले जात आहे.