Premium|Indian Textile Heritage : तांब्याच्या मण्यात जपला गेला आठ हजार वर्षांपूर्वीचा धागा; भारतीय वस्त्रकलेचा प्राचीन वारसा

Indian Textile Heritage and Handloom Tradition : मेहरगढमधील आठ हजार वर्षांपूर्वीच्या कापसाच्या धाग्यापासून भारतीय वस्त्रकलेचा समृद्ध इतिहास समोर येतो. मात्र घटती कारागिरांची संख्या आणि हातमाग परंपरेसमोरील आव्हानांमुळे या वारशाचे जतन करणे आवश्यक आहे.
Indian Textile Heritage and Handloom Tradition

Indian Textile Heritage and Handloom Tradition

esakal

Updated on: 

शेफाली वैद्य - saptrang@esakal.com

भारतीय हस्तकलेची खूप जुनी परंपरा आहे. आता त्याला भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. ही कला सर्वांपर्यंत पोहचविण्याची आवश्‍यकता आहे. दिवसेंदिवस हातमाग कारागिरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे हा धागा अधिक घट्ट करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.

बलुचिस्तानातल्या मेहरगढ येथे नवाश्मयुगातल्या एका थडग्यात पुरातत्त्व संशोधकांना तांब्याचे आठ मणी मिळाले. त्यातल्या एका मण्याच्या पोकळीत धाग्याचे काही तंतू अडकून राहिले होते. तांबे गंजत गेले, त्याचे क्षार धाग्यात झिरपले, आणि जो धागा मातीत केव्हाच विरून जायला हवा होता तो खनिज होऊन टिकला. फ्रेंच संशोधक क्रिस्तोफ मूलेरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या तंतूंची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली. ते तंतू कापसाचे निघाले. ते थडगे इसवी सनापूर्वीच्या सहाव्या सहस्रकाच्या पूर्वार्धातले होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मेहरगढ ही सिंधू-सरस्वती संस्कृतीची पूर्वसूरी मानली जाते. म्हणजे जवळजवळ आठ हजार वर्षांपूर्वीचा तो कापसाचा धागा भारतीय वस्त्रकलेच्या इतिहासात गुंतलेला आहे. भारताच्या वस्त्रकथेचे आज ज्ञात असलेले पहिले पान तांब्याच्या मण्यात अडकलेल्या एका साध्या धाग्यात ओवलेले आहे.

गेले वर्षभर आपण या सदरातून भारतीय वस्त्रकलेचा इतिहास जाणून घेतोय. मोहेंजोदडोची क्षारयुक्त माती कापड टिकू देत नाही, असे तिथे उत्खनन करणाऱ्या जॉन मार्शल यांनी नोंदवले होते तरीही चांदीच्या एका लहानशा फुलदाणीला विणलेल्या सुती कापडाचा एक तुकडा चिकटून राहिला होता. त्या धाग्यांना रंगही दिलेला होता. हा पुरावा दर्शवतो की सिंधू-सरस्वती संस्कृतीत भारतीय वस्त्रोद्योग किती प्रगत होता. वेद काळात तर संस्कृत साहित्यात अनेक अशा ऋचा आहेत ज्यामध्ये वस्त्र विणणे या तंत्राचा उपमा म्हणून अनेक ठिकाणी उपयोग केला गेलेला आहे, किंबहुना तंत्र हा शब्दच मुळी वस्त्र विणण्याच्या कलेतून जन्मलेला आहे. तंतू म्हणजे धागा आणि तंत्र म्हणजे ज्यावर तो धागा ताणला जातो तो माग.

Loading content, please wait...