Premium|Indian Arms and Armour : भारतीय शस्त्रे, शस्त्रांचा भारत!

History of Ancient Weapons : भारतीय शस्त्रांचा अभ्यास हा केवळ युद्धांचा इतिहास नसून तो तत्कालीन लोकजीवन, सांस्कृतिक वैविध्य आणि तांत्रिक कौशल्यांचा रोमांचकारी प्रवास उलगडणारा वारसा आहे.
Indian Arms and Armour

Indian Arms and Armour

esakal

Updated on

गिरिजा दुधाट

जुन्या शस्त्रांचा अभ्यास का करायचा, तर जुनी युद्धे समजून घेण्यासाठी? वीरपरंपरा समजून घेण्यासाठी? ते तर आहेच! पण त्याहून पुढे जाऊन तत्कालीन लोकजीवनातल्या ‘शस्त्रधारणा’ समजून घेण्यासाठी हा अभ्यास करायचा असतो. जीवे मारण्याचं एखादं साधन लोकभूमीतून युद्धभूमीकडे कसा प्रवास करतं आणि त्यामध्ये त्याच्याशी संबंधित सामारिक, सांस्कृतिक, धार्मिक धारणा का आणि कशा बनत, बदलत जातात? हा प्रवास व त्याचा अभ्यास युद्धांइतकाच रोमांचकारी आहे. खरं तर शस्त्रांचा अभ्यास करणं हे इतिहासाच्या अन्य शाखांहून फार अवघड आणि किचकट काम आहे. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विविध शाखा आणि शास्त्रे विकसित झालेली आहेत. उदाहरणार्थ, जुन्या नाण्यांसाठी नाणकशास्त्र, इमारती-मंदिरे यांसाठी स्थापत्यशास्त्र, मूर्तींसाठी शिल्पशास्त्र... यासारखे कुठलेही ‘शस्त्रशास्त्र’ अस्तित्वात नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर जुन्या शस्त्रांचा अभ्यास करायचा असेल, तर त्यासाठी विशिष्ट अशी संशोधन पद्धती, मार्गदर्शक पद्धती नाही. त्यामुळे अभ्यासण्याजोगे खूप आहे, मात्र तिथे पोहोचण्याचा रस्ता मात्र सहज-सुलभ नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com