
डॉ. अजित कानिटकर
लग्न समारंभांवरील प्रचंड खर्च हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेच्या मागणी- पुरवठा या तत्त्वाऐवजी संयमित खर्चाचा पर्याय जर समाजातील धुरिणांनी स्वीकारला तर काही अनुयायी तरी तसे मार्ग नक्कीच शोधतील.
सुमारे वीस वर्षांपूर्वी एका हिंदी चित्रपटामुळे भारतीय लग्न, त्यातील रंगीबेरंगी कपडे, दागिने, नृत्य, इत्यादीची भारताला व जगालाही नव्याने ओळख झाली. त्यापूर्वी सुमारे वीस वर्षे अगोदर महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना, पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यातील एका राजकीय नेत्याने कुटुंबातील एका लग्नाच्या प्रसंगी लक्ष भोजनाचा घाट घातला होता आणि त्यावर बरीच टीका झाली.