Premium|Four Waves of Indian Migration : आग्नेय आशियात भारतीय लोक कसे पोहोचले? चार स्थलांतर लाटांचा इतिहास

Early Indian Settlers in Southeast Asia : आग्नेय आशियाच्या भारतीयीकरणामागे भारतीय संस्कृतीसोबत लोकांचेही स्थलांतर झाले. इतिहासकारांच्या मते अमरावती, गुप्त, पल्लव आणि पाल अशा चार प्रमुख लाटांमधून भारतीय लोक तिथे पोहोचले.
Four Waves of Indian Migration

Four Waves of Indian Migration

esakal

Updated on

डॉ. पुलिंद सामंत

आग्नेय आशियाच्या भारतीयीकरणामागे केवळ विचारांचे किंवा संस्कृतीचे स्थलांतर नव्हते; तर माणसेही स्थलांतरित झाली होती. वेगवेगळ्या काळात भारतातून गेलेल्या या प्रवाहांनी तिथल्या राज्यव्यवस्था, समाजजीवन आणि संस्कृतीवर ठसे उमटवले.

आग्नेय आशियाच्या ‘भारतीयीकरणा’ची चुणूक त्या भूभागातील देशांच्या, नद्या-पर्वतांच्या भारतीय नावांमधून आपण गेल्या लेखात पाहिली. अशी भारतीय भागाची नावे त्या भागात परस्पर तुलनेत कमी-अधिक प्रमाणात असंख्य आहेत, हे सांगितले तरी पुरे. वानगीदाखल काही अगदीच ठळक उदाहरणे इथे देऊन तो विषय आवरता घेऊ (प्रचलित अपभ्रंशित शब्द कंसात आहेत) ः मलेशियाची राजधानी पुत्रजय, इंडोनेशियाची राजधानी जयकृत (जयकर्ता, नंतर जाकार्ता), ब्रूनयची राजधानी बंदर श्री भगवान (बांदार सेरी बगावान). हाच प्रकार तिथल्या अनेक माणसांच्या (विशेषत: थाय आणि इंडोनेशियन) नावांच्या बाबतीतही आढळतो. त्यातली बरीच अर्थात अपभ्रंशित; पण काही आश्चर्यकारकरीत्या मूळ / शुद्ध स्वरूपातही आढळतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com