

Global Findex Report
esakal
भारतातील बँक खात्यांच्या प्रमाणामध्ये गेल्या १५ वर्षांमध्ये ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाणही वाढले आहे. जगाच्या अल्प मध्यम उत्पन्न देशांच्या तुलनेत भारतातील बँकिंगचे प्रमाण जास्त असले, तरीही बचतीसारख्या निकषांवर भारत अन्य देशांच्या तुलनेत अद्याप मागे असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
वित्तीय सर्वसमावेशकता हा कोणत्याही विकासाचा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे जागतिक बँकेने २०११पासून जागतिक फिनडेक्स डेटाबेस जाहीर करण्यास सुरुवात केली. या सर्वेक्षणातील हा पाचवा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तर, १४१ देशांतील १,४५,००० जणांची माहिती संकलित करण्यात आळी आहे. त्यामध्ये नागरिकांना कोणकोणत्या औपचारिक-अनौपचारिक वित्तीय सेवा उपलब्ध आहेत, ते बचत कशी करतात, कर्ज कशी काढतात, देयके कशी अदा करतात यांविषयीची माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच, मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर आणि डिजिटल सुरक्षा या घटकांविषयीही माहिती विचारण्यात आली होती. यातून समाजाच्या विविध घटकांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये किती तफावत आहे, याचा अंदाज येणे शक्य होऊ शकते.
भारतामध्येही बँक खाती वाढली असून, जनधन योजना, ऑनलाइन बँकिंग यांमुळे बँक खात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातून सरकारच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीही याचा फायदा झाला आहे.