Why India’s Higher Education Must Leap Forward to Match Its Economic Rise
esakal
डॉ. अशोक कुडले, शिक्षणक्षेत्र व अर्थशास्त्राचे अभ्यासक
गे ल्या काही वर्षांमध्ये भारताने आर्थिक आघाडीवर मोठी झेप घेतली आहे. परिणामी, आज ब्रिटन, फ्रान्स, जपान, कॅनडा, इटली, रशिया यांसारख्या जगातील अत्यंत प्रगत अर्थव्यवस्थांना मागे टाकून भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. यामध्ये जसे औद्योगिक, सेवा व कृषीक्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, तसेच या क्षेत्रांना विद्वत्, कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या देशातील शिक्षणक्षेत्राचादेखील मोठा वाटा आहे.