

Zero enrollment schools
esakal
भारताची शिक्षणव्यवस्था सर्वात मोठी आहे. १४ लाखांहून अधिक शाळा, जवळपास २५ कोटी विद्यार्थी आणि सुमारे एक कोटी शिक्षक या व्यवस्थेचा भाग आहेत. तरीही देशात आठ हजार शाळा विद्यार्थ्यांविना भरतात... तब्बल २१ हजार शिक्षक वेतन घेतात. शून्य विद्यार्थिसंख्या वा कमी पटसंख्येची समस्या केवळ शाळा किंवा शिक्षण विभागाचीच नाही; तर ती समाजाच्या बदलत्या रचनेची अन् प्रशासनाच्या निष्क्रियतेचीही निशाणी आहे. उपाय सोपे नाहीत; पण शक्य आहेत.
शून्य विद्यार्थिसंख्या ही आजची समस्या नाही. तीन वर्षांचा इतिहास पाहिल्यास मागील वर्षी हा आकडा १२,९५४ शाळा इतका होता. २०२२-२३ मध्ये तो १० हजार इतका होता. त्यावर शासनाने काही उपाययोजना केली आहे का?
‘देशात आठ हजार शाळा विद्यार्थ्यांविना; परंतु २०,८१७ शिक्षक पगारी’ असा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. देशभरातली सर्व माध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची सर्वच स्तरावर चर्चा सुरू झाली. सुदैवाने म्हणा किंवा कसेही असो, देशातल्या राज्यांच्या या यादीत महाराष्ट्राचे नाव नाही, ही समाधानाची बाब आहे.