

Delivery worker
esakal
स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो, बिगबास्केट मिन्यूट, फ्लिपकार्ट मिन्यूट अशा अॅप्स वरून आपण जेव्हा एखादी गोष्ट मागवतो तेव्हा ती वस्तू आपल्याला काही मिनिटातच मिळायला हवी अशी आपण अपेक्षा करतो. वस्तू वेळेत हातात आली नाही तर फोन करून आपण त्या डिलिव्हरीबॉयला त्रास देत असतो. याच डिलिव्हरी करणाऱ्या लोकांनी मागील महिनाभर अनेक संप केले पण त्यांच्या हाती अजून काहीच लागलं नाही.
गिगवर्क याचा अर्थच मुळात असा असतो की, तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही काम करू शकता. पण या कंपन्या गिगवर्कच्या नावाखाली यांची फसवणूक करतात. कारण जो व्यक्ती त्यांच्या अटींप्रमाणे ठराविक तास काम करेल, दिलेलं टारगेट पूर्ण करेल त्यालाच पूर्ण पैसे मिळतात. जो व्यक्ती दररोज काम करेल, वेळेत काम पूर्ण करेल त्यालाच ऑर्डर मिळतात. त्यामुळे ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याचा कायमस्वरूपी या लोकांवर दबाव असतो. विशेषत: जिथे १० मिनिटात ऑर्डर पोहचवण्याची अट असते तिथे घाईगडबडीत अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सामान्य लोकांना आणि या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. भारतातील वाढती गरीबी आणि बेरोजगारी यामुळे या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर्मचारी उपलब्ध आहेत त्यामुळे या कंपन्या कमीत कमी पैशात या लोकांकडून काम करून घेत आहेत. ज्यांचं हातावर पोट आहे ते लोक नाईलाजास्तव रोजचे पैसे रोज मिळतात म्हणून अशी कामे करत आहेत. नीती आयोगाच्या अहवालानुसार येणाऱ्या काही काळात या गिगकामगारांची संख्या २ कोटी ३० लाखांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे परराष्ट्रांप्रमाणे कायदे करून या कामगारांना न्याय मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
या कामगाराच्या अडचणी काय आहेत? आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांना हा प्रश्न गंभिर का वाटतो या विषयी सविस्तर जाणून घ्या सकाळ+ च्या या लेखातून.