
पुणे: एकीकडे मंदी आहे, नोकऱ्या नाहीत ही ओरड असताना आयटी क्षेत्राचं चित्र काही वेगळंच आणि सकारात्मक दिसत आहे. नॅसकॉम (NASSCOM) म्हणजे 'नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज'या संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राची पुढील दोन वर्षांची वाटचाल कशी असेल याविषयी सांगण्यात आले आहे.
पुढील आर्थिक वर्षामध्ये भारतीय आयटी क्षेत्राची वाटचाल कशी असेल? उद्योगांच्या वाढीला चालना देणारे घटक कोणते असतील? जागतिक अर्थव्यवस्थेचा भारतीय आयटी क्षेत्राच्या प्रगतीवर कसा परिणाम होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.