

Juvenile crime
esakal
काही दिवसांपूर्वी राजगुरूनगरमध्ये १५ वर्षाच्या मुलाने त्याच्याच वर्गातील मुलाची भर दिवसा वर्गात हत्या केली. त्या मुलाला कोणती शिक्षा होणार असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या मुलाला कोणतीही कठोर शिक्षा होणार नाही, कारण बालगुन्हेगारांसंबंधीच्या २०१५ साली झालेल्या कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना बाल गुन्हेगार म्हणून वागणूक दिली जाते. कितीही गंभीर गुन्हा असेल तरी सुध्दा या मुलांना प्रौढांप्रमाणे कठोर शिक्षा देता येत नाहीत. हातून गुन्हा घडला असला तरी त्या मुलाला सुधारण्यासाठी संधी दिली जाते. शिक्षा म्हणून अशा मुलांकडून समाजउपयोगी कामे करून घेतली जातात.
भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या मते १४–१८ वयोगटातील बालगुन्हेगारांमधील बरेच गुन्हेगार वयाचा फायदा घेऊन असे गुन्हे वारंवार करतात. बालगुन्हेगारीचा वयोमर्यादेचा निकष १८ वर्षांऐवजी १४ वर्ष ठेवण्यात यावा असे त्यांनी विधेयक संसदेत मांडले आहे. त्या अनुषंगाने भारतात खरंच बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे का? या बालगुन्हेगारांच्या शिक्षेमध्ये प्रौढांच्या तुलनेत काय फरक असतो? मनोज तिवारी यांचे विधेयक काय सांगते? आणि परदेशातील बालगुन्हेगारीचे प्रमाण आणि कायदे यामध्ये काय फरक आहे? हे सगळं जाणून घ्या सकाळ+च्या या लेखामधून.