
प्रा. सुरिंदर एस. जोधका
स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास
आणि विस्तारासह भारतीय मध्यमवर्गाचा आकार अनेक पटींनी वाढला आहे. १९९१ नंतर भारतामध्ये नवमध्यमवर्ग उदयास आला. त्यानंतरच्या २० ते २५ वर्षांत त्यामध्ये वाढ होत गेली. त्यानंतर मात्र त्यामध्ये वाढ होत नसून हा वर्ग आता कुंठित झाला आहे. मध्यमवर्गाच्या आकांक्षा वाढताना दिसत आहेत, पण मध्यमवर्गाची अर्थव्यवस्था वाढताना दिसत नाही.
मध्यमवर्ग भारतात नवीन नाही. १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात ब्रिटिशांनी कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास ब्रिटिश प्रेसिडेन्सी तयार केल्या होत्या. या शहरांमध्ये नव्याने उदयास आलेल्या श्रीमंत आणि शिक्षित लोकांच्या गटासाठी हा शब्द सर्वप्रथम वापरला जाऊ लागला. कालांतराने उपखंडात इतर शहरांमध्येही मध्यमवर्गाचा विस्तार झाला.