Premium| New Labour Laws India: कामगार कायदे आणि काँग्रेसचा संभ्रम

Worker Rights: नवे कामगार कायदे लागू झाल्याने रोजगार, मजुरी आणि सुरक्षिततेवर मोठा परिणाम होणार आहे. मात्र काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर अपेक्षित भूमिका घेतलेली नाही
Labour Laws

Labour Laws

esakal

Updated on

अजय तिवारी

नव्या कामगार कायद्यांबाबत साधी चर्चाही झाली नाही. काहींचा अपवाद सोडल्यास विरोधी पक्षांनीही त्याबाबत मते व्यक्त केली नाहीत. विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसनेही या बदलांकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या कामगार कायद्यांवर चिंता व्यक्त करणे तर दूरच, या विषयावर साधी चर्चाही झाली नाही. ही बाब कामगार संघटनांच्या नेत्यांना आश्चर्यकारक वाटली. कारण काही दिवसांपूर्वीच, १२ डिसेंबर रोजी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नव्या कामगार कायद्यांच्या विरोधात कामगार संघटनांना साथ देण्याचे आश्‍वासन दिले होते.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसद भवनातील विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षात दहा प्रमुख कामगार संघटनांच्या नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची होती. ‘शेतकऱ्यांचे प्रश्न नीट समजले आहेत; मात्र कामगारांचे प्रश्न अजून समजून घ्यायचे आहेत,’ असे स्पष्टपणे त्यांनी या नेत्यांना सांगितले होते. नव्या कायद्यांबाबत कामगार संघटनांनी सादरीकरण करून त्यातील खाचाखोचा समजावून सांगाव्यात अशी विनंतीही राहुल गांधी यांनी त्यावेळी केली होती. तसेच कामगार नेत्यांशी समन्वय साधण्यास त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना, कार्यालयीन अधिकाऱ्यांना सांगितले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com