
डॉ. अजित कानिटकर
केंद्र सरकारने ‘खेलो भारत नीती-२०२५’ या नावाचे वीस पानांचे क्रीडा धोरण देशासाठी प्रसिद्ध केले आहे. पुढील पंधरा वर्षे देशामध्ये क्रीडा क्षेत्रात कशी वाटचाल व्हायला हवी, याचे उत्तम दिशादर्शन करणारे हे धोरण. परंतु गरज आहे ती तेवढ्याच ताकदीने या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे.
क्रीडाक्षेत्राकडे आपण समाज म्हणून कशारीतीने पाहतो, हे शाळांमधील वातावरणातून लक्षात येते. खेळाचा तास हा बहुतेक शाळांच्या वेळापत्रकातून कटाप झालेला दिसतो. ही नकारात्मक मानसिकता बदलण्यासाठी कसून प्रयत्नांची गरज आहे.