Premium|DGCA FDTL Rules : डीजीसीएच्या नियमांकडे इंडिगोचे दुर्लक्ष; प्रवाशांचा संताप, सेवांमध्ये कपात

Indigo flight cancellation : फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमावलीचे पालन न केल्यामुळे इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा विस्कळीत; यामुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप आणि डीजीसीएने प्रवाशांची नाराजी लक्षात घेऊन कंपनीच्या वाहतुकीत दहा टक्के कपात केली.
DGCA FDTL Rules

DGCA FDTL Rules

esakal

Updated on

जितेंदर भार्गव -Jitenderbhargava@gmail.com

वैमानिक अन् क्रू सदस्यांच्या कामाचे तास आणि त्यांना जाणवणाऱ्या थकव्याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमावली लागू केली; पण ‘आपण ६५ टक्के प्रवाशांची वाहतूक करतो. आपणच राजा आहोत’ अशा आविर्भावात ‘इंडिगो’ने त्याकडे दुर्लक्ष केले... आता प्रवाशांच्या नाराजीची दखल घेत ‘डीजीसीए’ने प्रवासी वाहतुकीत दहा टक्के कपात केली आहे. ‘प्रवासी हाच खरा राजा असतो, त्याच्याशी खेळू नये’ हेच झाल्या प्रकारातून प्रतीत होते.

ज्या विमानसेवांना पुरेसे वैमानिक नाहीत, त्या इंडिगोने रद्द करायला हव्या होत्या. त्याबाबतच्या सूचना प्रवाशांना देऊन विमान रद्द करण्याबाबतची कारणे सांगायला हवी होती. दुसऱ्या विमान कंपनीत प्रवाशांची व्यवस्था करून देता आली असती. मात्र, त्यांनी असे काहीही केले नाही.

आपल्या देशात १९९० नंतर ‘ओपन स्काय पॉलिसी’ आणण्यात आली. खासगी कंपन्यांना विमान चालवण्यास परवानगी देण्यात आली. किती कंपन्या आल्या आणि बंद झाल्या. काही विमान कंपन्या बराच वेळ चालल्या. अशा यशस्वी कंपन्यांपैकी एक म्हणजे ‘इंडिगो’. २००६ मध्ये ती आली. तिचा मार्केट फेअर (प्रवासी वाहतूक टक्का) २०११ मध्ये २० टक्के झाला. २०१२ मध्ये ‘किंगफिशर’ कंपनी बंद झाली. त्यावेळी ‘इंडिगो’चा मार्केट फेअर २७ टक्के झाला. ‘जेट एअरवेज’ बंद झाली तेव्हा तो ५० टक्क्यांवर गेला. ‘गो फर्स्ट’ बंद झाली तेव्हा ५५ टक्के मार्केट फेअर आला. आता तो आकडा ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com