Premium|Inflammaging and Ageing : शरीरात सतत धुमसणारा दाह म्हणजे इन्फ्लेमएजिंग काय?

Inflammaging and Healthy Ageing : वयानुसार शरीरातील प्रतिकारशक्तीचे संतुलन बदलल्याने दीर्घकाळ सौम्य दाह सक्रिय राहू शकतो. या प्रक्रियेला इन्फ्लेमएजिंग म्हणतात. तिचा आरोग्याशी काय संबंध आहे.
Inflammaging and Healthy Ageing

Inflammaging and Healthy Ageing

esakal

Updated on: 

डॉ. दिलीप निकम - sakal.avtaran@gmail.com

घरात अचानक आग लागली तर फायर अलार्म वाजतो, अग्निशमन दल येऊन आग विझवते आणि परिस्थिती पूर्ववत होते. पण आग विझल्यानंतरही राखेखाली एखादा निखारा सतत धुमसत राहिला, तर तो हळूहळू संपूर्ण घराचे नुकसान करू शकतो. आपल्या शरीरात होणाऱ्या दाहाची म्हणजेच ‘इन्फ्लेमेशन’ची गोष्टही काहीशी अशीच आहे.

२०२० मध्ये जगभर हाहाकार उडवून देणाऱ्या ‘कोविड १९’ रोगाची लक्षणे तुम्हाला आठवतात का? सर्दी होणे, घसा खवखवणे, घशाला सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही त्यांपैकी काही प्रमुख लक्षणे. विषाणूने शरीरावर आक्रमण केल्यामुळे संबंधित भागात लालसरपणा, सूज, उष्णता आणि वेदना निर्माण होतात. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ‘ॲक्यूट इन्फ्लेमेशन’ (तीव्र दाह) म्हणतात. खरे तर ही शरीराची नैसर्गिक संरक्षणव्यवस्था आहे. शरीरात कोणताही संसर्ग झाल्यास ही यंत्रणा कार्यरत होते. प्रतिकारशक्तीच्या पेशी संसर्ग झालेल्या ठिकाणी पोहोचतात, रोगजंतूंशी लढतात, खराब झालेल्या पेशी किंवा संसर्ग दूर करतात आणि जखम भरून काढण्यास मदत करतात. ही संपूर्ण क्रिया युद्धजन्य परिस्थितीसारखी गुंतागुंतीची असते. पण आपले शरीर वेगवेगळ्या पेशींद्वारे रासायनिक संदेश देऊन ती नियंत्रित करीत असते. युद्ध संपल्यावर ही यंत्रणा शांत होणे अपेक्षित असते. परंतु, काही वेळा शरीरात प्रत्यक्ष आग नसतानाही ही यंत्रणा निखाऱ्यांसारखी धुमसत राहते... इथे ताप नसतो, सूज स्पष्ट दिसत नाही आणि वेदनाही जाणवत नाही; तरीही रक्त आणि पेशींमध्ये दाह निर्माण करणारे संदेश फिरत राहतात. वय वाढताना निर्माण होणाऱ्या अशा दीर्घकालीन, सौम्य पण सतत सक्रिय दाहाला ‘इन्फ्लेमएजिंग’ म्हणतात. हा शब्द ‘इन्फ्लेमेशन’ (दाह) आणि ‘एजिंग’ (वृद्धत्व ) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. याचा अर्थ वृद्धत्व म्हणजे आजार किंवा प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या शरीरात धोकादायक दाह असतो असा नाही. मात्र, अनेक व्यक्तींमध्ये वयानुसार प्रतिकारशक्तीचे संतुलन बदलते आणि दीर्घकालीन दाह वाढण्याची शक्यता निर्माण होते. आयुर्वेदामध्ये शरीरातील सूज ही प्रामुख्याने वात, पित्त आणि कफ या दोषांच्या असंतुलनामुळे किंवा शरीरात ‘आम’ साचल्यामुळे निर्माण होते, असे मानले जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल आणि आहाराची जोड महत्त्वाची ठरते.

Loading content, please wait...