Premium|Information Overload: माहितीचा पूर असतानाही आपले निर्णय का चुकतात? मेंदुतील ‘रॉ डेटा’ चं करायचं काय?

Decision Making: Google उत्तरं देतंय, Social Media अपडेट्स देतंय आणि AI निर्णयात मदत करतंय; तरीही आयुष्याची उत्तरं का सापडत नाहीयेत?
Decision making problem

Decision making problem

Esakal

Updated on

पुणे -  एक काळ असा होता की माहिती मिळवण्यासाठी माणसाला पुस्तक शोधावं लागायचं, तज्ज्ञाला विचारावं लागायचं किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागायचा. आज परिस्थिती उलट आहे, माहिती शोधण्याची अडचण नाही तर माहितीतून काय निवडायचं, कशाला खरं म्हणायचं आणि कशाला खोटं ही नवी अडचण निर्माण झाली आहे.

Google एका प्रश्नावर हजारो पर्याय देतं. YouTube वर त्याच विषयावर शेकडो व्हिडिओ उपलब्ध आहेत. Instagram आणि Facebook चे algorithms आपल्या आवडीनिवडी ओळखून कंटेटचा ढीगच लावतात. ChatGPT सारखी generative AI साधनं केवळ माहिती शोधून देत नाहीत, तर तिचं विश्लेषण करून छान सजवून उत्तरं देतात. म्हणजेच माणसाच्या हातात माहिती, पर्याय आणि सल्ला तिन्ही पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत.

मग इतकं सगळं असूनही गणित कुठं बिघडलंय. अजूनही चुकीचे निर्णय होतायेत. शेअर बाजारात मध्यमवर्गीय पैसा हरतोय, रिलेशनशिपमध्ये लोकं फसतायेत, पैसा कमावयची असंख्य साधनं असुनही पैसा कमवताच येत नाहीये. अनेक मोठ्या कंपन्या सध्या म्हणतायेत की, आमच्याकडे डेटा खूप आहे पण तो प्रोसेस करण्याची ताकद आमच्यात नसल्यामुळे खूप सारा ‘रॉ डेटा’ तसाच पडून आहे. मेंदूचंही तसंच झालंय का?

असं का होतंय, डेटा काय सांगतोय, अभ्यास काय म्हणतायेत, मानसशास्त्रात काय म्हंटलं आहे..? चला नेहमीप्रमाणे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया सकाळ+ च्या या लेखातून...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com