

Language Policy Maharashtra
esakal
आपण अमराठी लोकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती केली, तर ते बोलायचं म्हणून तुटक्या फुटक्या पद्धतीत मराठी बोलतीलही; परंतु मराठी भाषेबद्दल त्यांच्यामध्ये प्रेम, आवड निर्माण होईल का, हा प्रश्न आहे. एखाद्या विषयाबद्दल आवड नसेल, तर आपण तो विषय कसा शिकू शकू? केवळ सक्ती करून प्रश्न सुटत नाहीत. सक्तीने राजकीय डावपेच खेळता येतील. शह, तह
सगळं काही शक्य होईल, पण मूळ मुद्दा मराठी भाषा वापराचा, प्रसाराचा तो कदाचित तसाच अनुत्तरित राहील...
सक्ती केल्याने कोणतीही गोष्ट दर्जेदार होणार नाही. सक्ती ही यांत्रिकी पद्धतीला, निरसतेला, प्रसंगी तिरस्कारालाही जन्म देते. मग ती कोणत्याही बाबतीत असूद्या. महाराष्ट्रामध्ये गेला आठवडाभर मराठी भाषा आणि त्याची सक्ती याबद्दल जे चाललं आहे, ते आपण ऐकतो आहोत, वाचतो आहोत. आपल्या माय मराठीचा प्रसार झाला पाहिजे. आपली माय मराठी ही टिकली पाहिजे, या त्याच त्या घासून गुळगुळीत झालेल्या मुद्द्यांपासून पुढे गेली पाहिजे आणि ते म्हणजे मराठीचा ‘प्रसार’ झाला पाहिजे; परंतु कोणत्याही भाषेचा प्रसार हा अचानक होणार नाही. आपण आक्रमक पद्धत वापरली तरी प्रसार अचानक होणार नाही. कारण ती एक भाषा आहे. त्याला एक व्याकरण आहे, त्या भाषेचे तिचे स्वतःचे काही शब्द आहेत. त्या शब्दांचे विशिष्ट उच्चार आहेत. भाषा शिकायची म्हणजे हे सर्व आलं. आपण अमराठी लोकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती केली, तर त्या सक्तीमुळे ते बोलायचं म्हणून तुटक्या फुटक्या पद्धतीत मराठी बोलतील; परंतु मराठी भाषेबद्दल त्यांच्यामध्ये प्रेम, आवड निर्माण होईल का, हा प्रश्न आहे. एखाद्या विषयाबद्दल आवड नसेल, तर आपण तो विषय कसा शिकू शकू? सक्ती केल्याने आवड कशी निर्माण होईल?