
सुनील चावके
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली विमान अपघाताच्या कारणांच्या चौकशीसाठी स्थापन केलेली उच्चस्तरीय चौकशी समिती, अपघाताच्या कारणांची शहानिशा करण्यासाठी ब्रिटन सरकारने पाठवलेले तज्ज्ञांचे पथक आणि खुद्द बोईंग कंपनीकडून सांगितली जातील, ती कारणे , या सगळ्यांतून नेमके काय घडले ते यशावकाश समोर येईल. पण तोपर्यंत भारतीय हवाई वाहतूकक्षेत्रात हरतऱ्हेच्या बाजारगप्पांना उधाण आले आहे.
भारतात रेल्वेगाड्यांना आणि रस्त्यांवरील वाहनांना होणाऱ्या अपघातांच्या तुलनेत हवाई प्रवास सर्वात सुरक्षित ठरला आहे. रत्याने आणि रेल्वेने लांब अंतराचा प्रवास करुन अनेक तास घालविण्यापेक्षा दोन-तीन तासात दूरच्या शहरात पोहोचण्यासाठी वेळेची आणि त्या प्रमाणात पैशाची बचत करणाऱ्या विमान प्रवासाला मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाची वाढती पसंती लाभली आहे.