
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २८६ धावा कुटल्या. तब्बल ३४ चौकार आणि १२ षटकार मारले. राजस्थाननेही १७ चौकार आणि १८ षटकार मारत २४२ धावांची मजल मारून दाखवली. एका सामन्यात ४० षटकांत ५२८ धावांचा पाऊस पडला. प्रेक्षक खूश झाले आणि संयोजक तर अजून खूश झाले; पण गोलंदाजांचा फक्त छळ झाला...