Premium|Iran Protests : इराणमधील खदखद

Middle East politics : इराणमधील महागाईजन्य आंदोलनाला अमेरिका व इस्राईलची अप्रत्यक्ष साथ असली, तरी सत्तापालटाने खरोखर बदल घडेल का, हा कळीचा प्रश्न आहे.
Iran Protests

Iran Protests

esakal

Updated on

श्रीराम पवार-shriram1.pawar@gmail.com

इराणधील आंदोलनाला अमेरिका व इस्राईल यांचा पाठिंबा आहे. इराणमधील आयातुल्लांची राजवट सध्या तरी सुरक्षा यंत्रणांच्या पूर्ण पाठिंब्यावर अवलंबून आहे. ट्रम्प यांना कोणत्याही देशात जमिनीवर सैन्य पाठवायचं नाही, इतकाच काय तो इराणमधील अमेरिकी कारवाईत तूर्त अडथळा आहे. अमेरिकेला हवं ते घडलं, तरी एक प्रश्न उरतोच. केवळ सत्तापालटानं काय साधतं? इराक, अफगाणिस्तान,

सीरिया, लीबिया कितीतरी ठिकाणी अमेरिकेने

राजवटी उलथल्या... पण तिथले बदल

आणखी गर्तेत टाकणारे ठरले.

गोष्ट इराणमध्ये इस्लामी क्रांती होण्याच्या आधीची. तिथं रझा पहेलवी या शहाचं राज्य होतं. ते अमेरिकाधार्जिणे होतं. हा शहा विलासी राहणीसाठी प्रसिद्ध होता. राजा असला तरी तोही हुकूमशहा होता. त्यानं जगभरातील निरनिराळ्या देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, राजेरजवाडे अशा प्रभावशाली लोकांसाठी एका खास पार्टीचं आयोजन आयोजन केलं होतं. त्यासाठी पर्शियन साम्राज्याला २५०० वर्षे पूर्ण झाल्याचं निमित्त शोधले होतं. साडेपाच तास ही मेजवानी होत असताना इराणमध्ये मात्र सामान्य लोकांसाठी रोजच्या जगण्याचा प्रश्न होता. महागाई टिपेला पोचली होती. राजाच्या विलासी जीवनाविरोधात लोक एकत्र येऊ लागले. या अस्वस्थतेवर स्वार होत काही काळानं आयातुल्ला खोमेनी यांची इस्लामी क्रांती आली. देश एका हुकूमशाहीकडून दुसऱ्या हुकूमशाहीच्या ताब्यात गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com