
Israel Gaza Ceasefire News In Marathi
निखिल श्रावगे
पश्चिम आशियात वरकरणी समेट दिसत असला तरी निखारे विझलेले नाहीत. शस्त्रसंधी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्राईलने गाझावर हल्ला करीत सुमारे ८० नागरिकांना मारल्याचे समोर येत आहे, तसेच इस्राईलच्या संरक्षणमंत्र्यांनी ‘समेट म्हणजे कमीपणाचे लक्षण’ या प्रकारची विधाने करून आपल्या सरकारची संघर्ष संपवायची अनिच्छाच व्यक्त केली आहे.