Premium|Jeffrey Archer Novels : पुण्यातील हाँगकाँग लेनपासून जागतिक लोकप्रियतेपर्यंत जेफ्री आर्चर यांचा प्रवास

Jeffrey Archer Literary Legacy : पुण्यातील हाँगकाँग लेनमधील जुन्या पुस्तकांच्या दुकानातून सुरू झालेली जेफ्री आर्चर यांच्या कादंबऱ्यांशी ओळख, ४२ पुस्तकांचा साहित्यप्रवास आणि जगभरातील कोट्यवधी वाचकांपर्यंत पोहोचलेले त्यांचे लेखन.
Jeffrey Archer Literary Legacy

Jeffrey Archer Literary Legacy

esakal

Updated on: 

प्रा.अविनाश कोल्हे - sakal.avtaran@gmail.com

१९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात पुण्यातल्या डेक्कन टॉकीजच्या अगदी बाजूला असलेल्या हाँगकाँग लेनमध्ये जुन्या पुस्तकांचं एक दुकान होतं. या दुकानात लोकप्रिय इंग्रजी कादंबऱ्या भाडेतत्त्वावर वाचायला मिळत असत. दहा रुपये अनामत रक्कम आणि आठवड्याचं भाडं, असा व्यवहार होता. कादंबरी वाचून झाली, की भाडं कापून अनामत रक्कम परत मिळत असे. या गल्लीत मला जसं हेरॉल्ड रॉबिन्स आणि जेम्स हॅडली चेस सापडले तसेच जेफ्री आर्चरसुद्धा सापडले आणि मग सापडतच गले. अलीकडे जेफ्री यांच्या निधनाची बातमी आली आणि डोळ्यांसमोर हाँगकाँग लेन तरळून गेली.

अनेक पाश्चात्त्य लोकप्रिय आणि अभिजात लेखकांप्रमाणेच जेफ्री यांचं (१९४०-२०२६) लेखन प्रचंड होतं. त्यांच्या नावावर तब्बल ४२ पुस्तकं आहेत. त्यात ३१ कादंबऱ्या आहेत. ३१ कादंबऱ्या, महाराजा! आपले बरेच मराठी कादंबरीकार दोन-तीन कादंबऱ्या लिहून थांबतात. या कादंबऱ्यासुद्धा अनेकदा आत्मचरित्रात्मक असतात. त्यात व्यक्तिचित्रांचा विकास, कल्पक कथानक, त्याची दर्जेदार बांधणी वगैरे फारसं नसतं. ‘लोकप्रिय लेखक’ म्हणून जेफ्री यांची कारकीर्द सुमारे पन्नास वर्षं सुरू होती. एका अंदाजानुसार त्यांच्या पुस्तकांची एकूण विक्री तीस कोटींहून अधिक भरते. इंग्लंडमधील ‘संडे टाइम्स’च्या बेस्ट सेलरच्या यादीत त्यांचं नाव पंधरा वर्षं स्थान मिळवून होतं; तर अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या यादीत पाच वर्षं. हे भाग्य हेवा वाटण्यासारखं आहे. १९७६ मध्ये त्यांची पहिली कादंबरी ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ने सुरू झालेला प्रवास ‘ॲडम अँड ईव्ह’ या शेवटच्या कादंबरीच्या प्रकाशनाने थांबला. ही कादंबरी प्रकाशित होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजे सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी त्यांना मृत्यूने गाठलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com