Premium|Stolen Focus Johann Hari : एक अखंडी ध्याया है..

Impact of digital technology on human attention span : डिजिटल युगात आपल्या लक्ष देण्याच्या क्षमतेची चोरी होत असून, यामुळे मानवी मेंदूच्या खोलवर विचार करण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत आहेत. गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्याऐवजी आपण उथळ प्रतिसादांकडे वळत आहोत, जे लोकशाही आणि भविष्यासाठी चिंताजनक आहे.
Stolen Focus Johann Hari

Stolen Focus Johann Hari

esakal

Updated on

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृतीचे अभ्यासक

गुंतागुंतीचे विचार, दीर्घ नियोजन, नैतिक पेचांबाबतची चर्चा, सर्जनशील काम आदी गोष्टी आपल्याला हळूहळू झेपेनाशा होतील, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. तुमच्यापैकी किती जणांना गेल्या काही वर्षांपासून पुढीलप्रमाणे अनुभव येत आहेत? आवडते पुस्तक वाचतोय; पण दोन-तीन पानांच्यापुढे सलग वाचता येत नाही. एखाद्या आवडत्या व्यक्तीशी बसून छान गप्पा मारतोय. पण दोनचार मिनिटातच फोनसाठी हात शिवशिवतायत. एखादे किचकट वेळखाऊ काम पूर्ण करायचेय; पण सुरू केल्यावर पाचदहा मिनिटातच आपण सोपी पळवाट शोधतोय. तुमचे स्वतःबद्दलचे अनुभव असे नसतील, तर उत्तमच. पण तसे असतील तर तुम्ही एकटे नाही. जगातील लाखो लोक स्वतःबद्दल अशी तक्रार करू लागले आहेत. इंग्लंडमध्ये पत्रकार म्हणून काम केलेल्या जोहान हॅरी यांनी ‘स्टोलन फोकस’ या पुस्तकात या सार्वत्रिक तक्रारींचा आढावा घेतला आहे. आपल्या लक्ष देण्याच्या, अवधान देण्याच्या क्षमतेचीच जणू सार्वत्रिक चोरी होत आहे, असा त्यांचा दावा. बारा व्यापक कारणांमुळे अवधानाची अशी चोरी होत आहे, असे हॅरी म्हणतात. त्यात ‘झोपेचे अपुरे प्रमाण’ ते ‘नव्या मानवी संस्कृतीचे दडपण’ अशा अनेक व्यवस्थात्मक कारणांचा ते समावेश करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com