

John Cena Retirement
esakal
‘डब्ल्यूडब्ल्यूई’ सुपरस्टार जॉन सीनाची निवृत्ती भारतीयांसाठी विशेष हळवी ठरली. ४८ वर्षीय जॉन भारतीयांसाठी हक्काचा सुपरस्टार होता, आहे आणि राहील... जॉन आता रिंगमध्ये दिसणार नाही, ही कल्पनाच अनेकांना अस्वस्थ करते. कारण भारतीय चाहत्यांसाठी तो फक्त रेसलर नव्हता; तर कधीही हार न मानणारा आदर्श होता.
र्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट अर्थात ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ सुपरस्टार जॉन सीना निवृत्त झाला. तब्बल २० वर्षांच्या कारकिर्दीत जॉनने १७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि एकदा ग्रँडस्लॅम चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. खेळाडू एक ना एक दिवस निवृत्ती घेतोच; तशीच ती जॉनने घेतली... पण ती भारतीयांसाठी विशेष हळवी ठरली. ४८ वर्षीय जॉन भारतीयांसाठी हक्काचा सुपरस्टार होता, आहे आणि राहील...
‘नमस्ते भारत’ असं म्हणत जेव्हा सुपरस्टार जॉन सीना आपल्या भूमीत आला तेव्हा चाहत्यांनी त्याला घातलेला गराडा त्याच्यावरील प्रेमाचाच पुरावा होता. त्यामुळेच जॉन सीना आता ‘डब्ल्यूडब्ल्यूई’च्या रिंगमध्ये दिसणार नाही, हे ऐकून भारतीय चाहत्यांना वाईट वाटणं साहजिक आहे.