
राजीव साबडे
वार्ताहर म्हणून मुशाफिरी करताना अनेकदा प्रासंगिक बातम्या आणि वार्तापत्रांना वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळालाच, पण नंतरही त्यातील काही विषय वेगवेगळ्या स्वरूपात पुढे येत राहिले. त्याबद्दलच्या नव्या वार्ता वाचकांपर्यंत पोहोचवताना जुन्यांचे संदर्भ आणि आठवणी यांचा पाया रचून मांडणी करावी लागली. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातील आठवणींवर आधारित लेखन आहे. काही व्यक्ती, स्थळं आणि प्रसंगांचं वर्णन करताना त्यांच्याशी नकळत जवळीक निर्माण झाली. त्यांचे संदर्भ, त्याविषयीच्या नंतरच्या घडामोडी यांचा मागोवा घेणे आणि त्याचा अभ्यास करणे याचा छंद जडला. तो वार्तांच्या झाल्या कथामधील लेखनात उतरविण्याचा मी प्रयत्न केला आहे.